भारतीय रेल्वेमध्ये गेल्या काही वर्षांपासून आधुनिकता आलेली पाहायला मिळत आहे. वंदे भारत ट्रेन असेल, बुलेट ट्रेन किंवा अनेक कठीण ठिकाणी पोहोचलेली भारतीय रेल्वे व्यवथा अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच ब्रिजवर ट्रेन चालविण्याचा विक्रम केला आहे. चिनाब येथे जगातील सर्वात उंच ब्रिज बांधण्यात आला आहे. संगलदान आणि रियासी दरम्यान ट्रायल ट्रेन चालवण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
भारतीय रेल्वेने चिनाब येथे जगातील सर्वात उंच पूल बांधला आहे. त्यावर ८ कोच असणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मार्गावर लवकरच रेल्वे सेवा सुरु केली जाणार आहे. येथे मेमू ट्रेनने यशस्वी ट्रायल पूर्ण केली आहे. ४६ किलोमीटरचा ट्रायल करण्यात आले होते. यावेळी ट्रेनचा वेग हा ताशी ४० किमी इतका होता. चिनाब येथे बांधण्यात आलेला हा जगातील सर्वात उंच पूल आहे. याची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या उंचीपेक्षा ३५ मीटरने जास्त आहे.