नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर काल म्हणजेच २५ जून पासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान याच अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान आज ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
लोकसभा अध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवारी द्यावी यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. या चर्चेमध्ये ओम बिर्ला यांच्या नावाला एनडीएच्या नेत्यांनी संमती दिल्याचे समजते आहे. त्यामुळे असे झाल्यास व विरोधकांनी आपला उमेदवार न दिल्यास ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष पद भूषविणार आहेत. थोड्याच वेळात ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी उमेदवार उभा न केल्यास ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.