आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आणीबाणीच्या 50 व्या स्मृतिदिनाचे स्मरण करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत म्हटले आहे की “आणीबाणीचे काळे दिवस काँग्रेस पक्षाची आठवण करून देतात. यावेळी भारतीय राज्यघटना पायदळी तुडवली गेली होती.
एक्स वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात की, “आजचा दिवस त्या सर्व महानायक आणि नायिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आहे ज्यांनी आणीबाणीचा प्रतिकार केला. आणीबाणीचे गडद दिवस आपल्याला आठवण करून देतात की काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्यांना कसे पायदळी तुडवले आणि भारतीय संविधान पायदळी तुडवले, ज्याचा प्रत्येक भारतीयाला आदर आहे”.
ते पुढे म्हणाले की, “केवळ सत्तेवर टिकून राहण्यासाठी, तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान केला आणि देशाला तुरुंगात टाकले. काँग्रेसशी असहमत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा छळ केला गेला, दुर्बल घटकांना लक्ष्य करण्यासाठी सामाजिक प्रतिगामी धोरणे राबवली गेली. ”
मोदींनी लिहिले आहे की, ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानावरील प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही. “हेच ते लोक आहेत ज्यांनी प्रेस स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी विधेयक आणले, संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले,”यामुळे भारतातील जनतेने काँग्रेसला वारंवार नाकारले आहे.
https://x.com/narendramodi/status/1805447851931222354
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हणतात की, “आणीबाणी हा आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे, ज्याची इच्छा असूनही विसरता येणार नाही. सत्तेचा दुरुपयोग ज्या प्रकारे केला गेला. आणि त्या काळात हुकूमशाहीचा उघड खेळ खेळला गेल्याने अनेक राजकीय पक्षांच्या लोकशाहीप्रती असलेल्या बांधिलकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते .”
“आजही या देशात लोकशाही जिवंत असेल तर त्याचे श्रेय त्या लोकांना जाते ज्यांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला, तुरुंगवास भोगला आणि ज्यांना खूप शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. भारतातील येणाऱ्या पिढ्या त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान लक्षात ठेवतील”.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की की, “देशातील लोकशाहीची हत्या करण्याचा आणि वारंवार हल्ला करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. 1975च्या या दिवशी काँग्रेसने लादलेली आणीबाणी हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. अहंकारी, निरंकुश काँग्रेस सरकारने एका कुटुंबाच्या सत्तेच्या आनंदासाठी देशातील सर्व नागरी हक्क 21 महिन्यांसाठी हिरावून घेतले होते. यावेळी त्यांनी माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली, यावेळी त्यांनी संविधानात बदल केले आणि न्यायालयाचेही हात बांधले”. आणीबाणीच्या विरोधात संसदेपासून रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या अगणित सत्याग्रही, सामाजिक कार्यकर्ते, कामगार, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या संघर्षाला माझा सलाम आहे.
https://x.com/AmitShah/status/1805430469208818123
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आणीबाणीचा प्रतिकार करत दाखवल्या गेलेल्या धाडसाचे स्मरण करत योगदान दिलेल्याना आपल्या एक्स वरील पोस्टमधून आदरांजली वाहिली आहे.”भारतीय लोकशाहीसाठी काळा काळ असलेल्या आणीबाणीच्या वेळेस त्या आव्हानाचा प्रतिकार करणाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्याची आठवण करा. त्या काळात समाजाने एकत्र येत लोकशाहीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आजही आपल्या लोकशाहीचे संरक्षण, जतन आणि लढा देण्यासाठी सतत कार्य करत राहण्याची गरज आहे” असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या 21 महिन्यांच्या आणीबाणीचे स्मरण करत आज देशव्यापी कार्यक्रम राबवणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.