काल टी-२० वर्ल्ड कप सुपर ८ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला. कालच्या सामन्यात भारताने २४ धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता २७ जून रोजी भारत इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने २४ धावा देत २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
तर ट्रेव्हिस हेड हा भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. मात्र अखेर जसप्रीत बुमराहने हेडची विकेट घेऊन भारताला मोठा दिलासा दिला आहे. तू अर्षदिप सिंगने ३७ धावा देत ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अक्षर पटेलने देखील एक विकेट्स घेतली. दरम्यान अवघ्या सामन्यात अक्षर पटेलने पकडलेल्या कॅचची चर्चा सुरु होती.
सुरुवातीला फलंदाजी करताना भारताने २०५ धावा केल्या. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने वेगवान ९२ धावा करत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. तर शेवटच्या टप्प्यात हार्दिक पंड्याने फटकेबाजी केल्याने भारताने २०५ धावांचा डोंगर उभा केला. शिवम दुबेने २८ धावा केल्या.