सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान काल आणि आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना जय पॅलेस्टाईन घोषणा दिल्याने वाद उभा राहिला. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मंगळवारी (२५ जून) संसदेत खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र प्रोटेम स्पीकर यांनी हा शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकला आहे.
लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राधामोहन सिंह यांनी शपथेशिवाय काहीही रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार नाही, असे आश्वासन सदस्यांना दिले. यानंतर प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब पुन्हा सभापतीपदावर आले आणि त्यांनीही केवळ शपथ किंवा प्रतिज्ञापत्र नोंदवले असल्याचे सांगितले. 2019 च्या सुरुवातीला जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा ओवेसी यांनी “जय भीम, अल्लाह-ओ-अकबर आणि जय हिंद” या शब्दांत शपथ घेतली होती.