राजधानी दिल्लीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीच्या जलसंपदा मंत्री आतीशी या दिल्लीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी उपोषण करत आहेत. दिल्लीतील जनतेला त्यांचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी पाच दिवस उपोषणाला बसलेल्या जलमंत्री आतिशी यांनी आता आपले उपोषण संपवण्याची घोषणा केली आहे. आता आम आदमी पक्षाचे खासदार पाण्याच्या मागणीबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहेत.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, डॉक्टरांनी आतिशी यांना उपोषण सोडण्याचा सल्ला दिला होता. काल रात्री आतिशीची तब्येत बिघडल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. त्यानंतर एलएनजेपी हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये आतिशीच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. रक्तातील साखरेची पातळी 36 असल्याचे सांगण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागेल, अन्यथा आतिशीचा जीव जाऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. संजय सिंह यांनी सांगितले की, अतिशी यांना दुपारी 3.30 वाजता एलएनजेपी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आतिशी अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्या लवकर बरा व्हावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.
सध्या देशातील अनेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भीषण टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पाण्याची मोठी टंचाई असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान जलसंपदा मंत्री आतीशी यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांना पत्र लिहिले आहे.हरियाणा सरकारने आमच्या हक्काचे पाणी द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.