पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओम बिर्ला यांना 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि म्हंटले आहे की, अमृत काल दरम्यान दुसऱ्यांदा.या पदावर बसणे ही मोठी जबाबदारी आहे.
ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील १७ वी लोकसभा संसदीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जाईल, असे म्हणत पंतप्रधानांनी ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष असताना १७ व्या लोकसभेच्या काळात महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
“आदरणीय सभापती, तुम्ही दुसऱ्यांदा या खुर्चीवर विराजमान होत आहात हे सभागृहाचे सौभाग्य आहे. मी तुमचे आणि संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करतो. सभागृहाच्या वतीने मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. अमृत कालच्या दरम्यान दुसऱ्यांदा या पदावर बसत आहात
“दुसऱ्यांदा सभापती होणे हा एक विक्रम आहे. बलराम जाखड यांना पाच वर्षे निवडणूक लढवल्यानंतर दुसऱ्यांदा सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली . तसेच खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात ते मोलाचे आहे. तुमची शैली आमच्या तरुण खासदारांना प्रेरणा देईल, असे पंतप्रधान मोदी ओम बिर्ला यांना उद्देशून म्हणाले आहेत. तसेच ‘आपके चेहरे पर ये मीठी मुस्कान पुरे सदन को प्रसन्न रखती है’.असे म्हणत मोदींनी ओम बिर्ला यांचे दिलखुलास कौतुक केलेले बघायला मिळाले आहे.
पुढे, पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या भविष्याला दिशा देण्यात 17 व्या लोकसभेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“तुमच्या अध्यक्षतेखालील संसदेत घेतलेले ऐतिहासिक निर्णय हा संसदेचा विशेष वारसा आहे. भविष्यात जेव्हा 17व्या लोकसभेबाबत विश्लेषण होईल, तेव्हा तुमच्या अध्यक्षतेखालील 17व्या लोकसभेने एक भूमिका बजावली आहे, असे लिहिले जाईल. भारताच्या भविष्याला नवी दिशा देण्यात तुमची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“17 व्या लोकसभेत, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक, ग्राहक संरक्षण विधेयक, थेट कर, तुमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात असे अनेक महत्त्वाचे कायदे या सभागृहात मंजूर झाले आहेत, ज्यांनी देशाचा भक्कम पाया घातला आहे,” पंतप्रधान पुढे म्हणाले आहेत. .
बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली 17 व्या लोकसभेची उत्पादकता 25 वर्षांतील सर्वाधिक 97 टक्के आहे, असेही पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणून दिले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या जागेपर्यंत जाण्यास सोबत केली.