शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस हा कात्यायनी मातेला समर्पित असतो. ब्रह्मदेवाची मानसकन्या अशीही कात्यायनी देवीची ओळख आहे.
कात्यायनी देवीचे रूप तेजस्वी असून तिला चार हात आहेत.देवीचे रूप तेज:पुंज असून ती चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तिसरा हात आशीर्वाद म्हणून उंचावला आहे, तर चौथ्या हात शरणार्थी भक्तांना अभय देत आहे .तसेच तिचे वाहन सिंह असून तिला युद्धदेवता म्हणले जाते.दुर्गा सप्तशती स्तोत्रामध्ये मध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे पाहायला मिळते.
पुराणातील दाखल्यानुसार, महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चर्येनंतर दुर्गा देवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली.या रूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्याच्या त्रासापासून सुटका केली होती.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे
दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायणी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे.तसेच महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये कात्यायनी देवीचे मंदिर पाहायला मिळते.