पुण्यातील बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद विचारमंच ही संस्था रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित असून या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येत असलेली व्याख्यानमाला !
स्वामी विवेकानंद विचारमंच आयोजित ही व्याख्यानमाला पुणेकरांसाठी वैचारिक मेजवानीच असते. या व्याख्यानमालेचे यंदाचे २४ वे वर्ष असून या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते या व्याख्यानमालेस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
१) दि. ९ जानेवारी २०२५ गुरूवार,
प्रमुख वक्ते :- ह. भ. प. श्री. शिरीष महाराज मोरे,
विषय :– छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व
२)दि. १० जानेवारी २०२५ शुक्रवार,
प्रमुख वक्ते :- मा. श्री. सुनिल देवधर,
विषय :– पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
३) दि. ११ जानेवारी २०२५ शनिवार,
प्रमुख वक्ते :- मा. अॅड. श्री. अश्विनी उपाध्याय,
विषय :– वक्फ बोर्ड,
४) दि. १२ जानेवारी २०२५ रविवार,
प्रमुख वक्ते :– वक्ते :– पद्मश्री मा. अॅड. उज्वल निकम, विषय :– समर्थ भारत,
स्थळ ;संगम हॉल, विवेकानंद पुतळ्याजवळ, अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर, सातारा रोड, पुणे ३७
सर्व व्याख्यानांची वेळ:- दररोज सायंकाळी ६:३० वाजता
याप्रमाणे दि. ९ ते १२ जानेवारी २०२५ या काळात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या सर्व व्याख्यानांना जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः तरुणांनीही यावे असे आवाहन स्वामी विवेकानंद विचारमंचातर्फे करण्यात आले आहे.