Sinita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) २८६ दिवस घालवल्यानंतर अखेर बुधवारी सुखरूप पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यामुळे सध्या त्या चर्चेचा विषय ठरल्या आहे.सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याने जगभरात आनंदाचे वातावरण आहे, मात्र त्याहीपेक्षा आनंदाचे वातावरण भारतात आहे. कारण सुनिता या मुळच्या भारतीय आहेत.गुजरात राज्यातील झुलासन हे त्यांचे गाव आहे. त्यामुळे झुलासनमध्ये आनंदाचे वातावरण आहे
अंतराळातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यानी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्याचे फोटो टिपण्याची एक अनोखी संधी साधली. सुनीता त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत असताना, अंतराळातून या भव्य कार्यक्रमाचे फोटो काढण्यात यशस्वी झाल्या त्यानंतर त्यांनी ते फोटो आपली बहिण फाल्गुनी पांड्यासोबत शेअर केले. फाल्गुनीने नंतर त्या क्षणाबद्दल एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, त्यावेळी अंतराळात असलेल्या सुनीता यांना तिने अंतराळातून कुंभ दिसतो का? आणि तिथून तो कसा दिसतो असे विचारले होते. त्यानंतर सुनीता यांनी त्यांना महाकुंभमेळ्यातील तेजस्वी रोषणाई दाखवणारा एक आश्चर्यकारक फोटो पाठवला. याबाबत महाकुंभाच्या अधिकृत आयडीवरूनही माहिती देण्यात आली आहे.
फाल्गुनी यांनी सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याने पूजा अर्चा आणि हवन केल्याचीही माहिती दिली. सुनिता विल्यम्स या परत आल्याने त्यांच्या वडिलोपार्जित गावात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. त्यांच्या मोठ्या भावानेही गावात पूजापाठ सुरू असल्याचं सांगितलं आहे. सुनीता त्यांच्या सोबत अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेली होती. तिने मला अंतराळ केंद्रावर गणेशाचं एक छायाचित्र पाठवलं होतं. 2007 मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनीता आणि तिच्या वडिलांनी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. सुनीताला भारतीय जेवण खूप आवडते. आम्ही पुन्हा भारतात येणार आहोत, असं फाल्गुनी पंड्याने मुलाखत देताना सांगितलं आहे.
फाल्गुनीने पुढे सांगितले की, सुनीता तिच्या तिसऱ्या अंतराळ मोहिमेवर असताना तिने २००७ मध्ये अर्धकुंभमेळ्यादरम्यान असेच दृश्ये टिपली होती, तेंव्हा देखील ती अंतराळात होती. फाल्गुनीने नमूद केले की सुनीता परतण्यापूर्वी चॅटबॉट ग्रोकने तिला महाकुंभाचे फोटो काढण्याची विनंती केली होती. ग्रोकच्या मते, सुनीताने गंगेच्या काठावरील चमकदार दिवे दाखवणारा फोटो पाठवला होता, जो कार्यक्रमाची भव्यता उत्तम प्रकारे दर्शवितो. सुनीता यांच्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीर बुच विल्मोर आणि इतर दोघांचा समावेश होता.