बेंगळुरू येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS)अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सुरुवात झाली. या सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे देखील उपस्थित होते. त्यांनी जनसेवा विद्याकेंद्र, चेन्नेई बेंगळुरू येथे भारत मातेला पुष्पांजली अर्पण केली.अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटन दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मुकुंद सीआर यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यानी संघटनात्मक विस्तार, सामाजिक प्रभाव, सुसंवाद आणि एकता याकडे लक्ष वेधले ते म्हणाले की, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला (एबीपीएस) उपस्थित एकूण कार्यकर्त्यांची संख्या १४८२ आहे.बैठकीच्या सुरुवातीस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तालवादक झाकीर हुसेन, गायक श्याम बेनेगल, बिबेक देवरॉय, देवेंद्र प्रधान आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा या व्यक्तिमत्त्वांचे गेल्या वर्षभरात निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असे मुकुंद सीआर यांनी सांगितले.
संघाच्या कार्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी लाखो तरुण, विशेषतः १४-२५ वयोगटातील, स्वयंसेवक म्हणून आरएसएसमध्ये सामील होतात. देशभरात एकूण ४,४१५ प्ररंभिक वर्ग (प्रारंभिक शिबिर) आयोजित करण्यात आले होते. या वर्गांना २,२२,९६२ जण उपस्थित होते, त्यापैकी १,६३,००० जण १४-२५ वयोगटातील होते. यातील २०,००० हून अधिक जण ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते.असे मुकुंद यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की महाकुंभादरम्यान, संघ-प्रेरित अनेक संस्था आणि संघटनांनी विविध प्रकारचे सेवा, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी संघ कार्यकर्त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचाही उल्लेख केला.
येत्या विजयादशमीला संघाच्या कार्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत; त्यामुळे विजयादशमी २०२५ ते २०२६ हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष मानले जाईल. शताब्दी वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच आगामी वर्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आणि मोहिमांची रूपरेषा बैठकीत तयार केली जाईल. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघाचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आणि देशभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच भाजपच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय संघटन मंत्री बीएल संतोष हे देखील उपस्थित राहणार आहेत.