हिंदूंसाठी ३३ कोटी देवी देवतांचा वास असणारी गोमाता म्हणजे सगळ्या सश्रद्ध हिंदूंसाठी देवतुल्यच. भारतात लोकसंख्येच्या ८० टक्के असलेल्या हिंदू धर्मियांसाठी गाय अत्यंत पवित्र आहे. मात्र, देशात मुस्लिम किंवा ख्रिस्ती लोकांकडून हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी व त्यांना डिवचण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यामध्ये गायींच्या तस्करी, गायींच्या कत्तली हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींचे रक्षण करण्यासाठी गोरक्षक कायम पुढे आले आहेत. याच गोरक्षकांवर सात्यत्याने होणारे हल्ले हा मुद्दा आता चिंतेचा बनला आहे.
मुस्लिमांकडून होणाऱ्या गायींची तस्करी, गायींची हत्या रोखण्यासाठी गोरक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता कायम काम करत आले आहेत. प्रत्येक राज्यात गोरक्षक गायींचे रक्षण करण्यासाठी काम करत आहेत. पण गेल्या काही काळापासून याच गोरक्षकांवर मुस्लिमांकडून हल्ला करण्यात येत आहे.
नुकतीच एक घटना कर्नाटकमधील मंगळुरू येथे घडली असून, या घटनेनंतर हिंदू संघटनांकडून याचा निषेध व्यक्त येत आहे. कर्नाटक मध्ये घडलेल्या या घटनेनंतर सध्या कर्नाटक राज्यात गोंधळ उडाला असून, पोलिसांनी देखील अलर्ट जरी केला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…
शुक्रवारी (१ मे) रात्री मंगळुरूच्या बाहेरील भागात अज्ञात इस्लामी गटाने एका हिंदू गोरक्षकाची धार दार तलवारीने निर्घृण हत्या केली. रक्षक सुहास शेट्टी (३२) याला बाजपे किनीपाडवू येथे लक्ष्य करण्यात आले यावेळी त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एका व्हिडिओमध्ये कैद करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजात खळबळ उडाली व कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास शेट्टी, त्यांचे सहकारी संजय, प्रज्वल, अन्वित, लतीश आणि शशांक यांच्यासोबत एका गाडीतून प्रवास करत होते. ते किनीपाडवू क्रॉसजवळ पोहोचताच, स्विफ्ट कार आणि पिकअप जीपमधून प्रवास करणाऱ्या ५ ते ६ गुंडांच्या गटाने त्यांच्या गाडीला अडवले. कोणतीही पूर्वसूचना न देता हल्लेखोरांनी सुहासवर तलवारींसह प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला, ज्यामुळे सुहास गंभीर जखमी झाला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
आता ही पहिलीच घटना नाही जेव्हा गोरखकांवर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला. याधीही अशीच एक घटना महाराष्ट्रातील नांदेड मध्ये घडली आहे. तेव्हा देखील गोरक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. १९ जून २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील अप्पारोपेठ गावात गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. १९ जूनच्या रात्री किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अप्पराव पेठ गावाजवळ, संशयित बोलेरो पिकअप गाडी मलकजाव तांडा येथील एका पुलाजवळ थांबली. त्यावेळी शिवनी येथील गोरक्षक कार्यकर्त्यांनी, या गाडीतील प्रवाशांची चौकशी केली. यानंतर गाडीतील सुमारे १० ते १२ जणांच्या गटाने, इतर काही जणांसह, गोरक्षक कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या घटनेत गोरक्षक कार्यकर्ते शेखर रापेली यांचा जीव गेला. या प्रकरणात शेख इसाक शेख चांद, शेख आमेर शेख अलीम, शेख मुजाहिद शेख इसाकआणि शेख मुजेमिर शेख फयाज यांना अटक करण्यात आली होती.
आता या दोन्ही घटनांकडे पहिले तर दोन्ही प्रकरणं सारखीच आहेत. यामध्ये मृत्यू झालेले दोघेही गोरक्षक आहेत आणि ज्यांनी हत्या केली त्यामध्ये कट्टरतावादी आहेत. दोन्ही घटनेबाबत विचार केला तर आधीपासूनच या हत्येचे प्लॅनींग झाले असल्याचे समोर येते. आणि ठरवून गोरक्षकांना संपवण्याचे प्लॅनींग सुरु असल्याचे देखील समोर येते. जिहादी मानसिकता समोर ठेवून गोरक्षांना टार्गेट केलं तर काही काळानुसार गोरक्षक संपतील अशा हेतून त्यांच्यावर सातत्याने हल्ला करण्यात येत असल्याचं काहींचं म्हणण आहे.
गोरक्षकांवर हल्ले का होतात ?
भारतात गायींच्या तस्करीवर तसेच कत्तलीवर बंदी असताना देखील कट्टरतावाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी तसेच कत्तली होतात. या कत्तली रोखण्यासाठी गोरक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता जोखीम घेऊन या गायींची रक्षा करतात. गायींच्या रक्षणासाठी गोरक्षक स्वतःहून कारवाई करतात, ज्यामुळे ते तस्कर व स्थानिक गुंडांच्या निशाण्यावर येतात.
गायींची तस्करी नेहमी रात्रीच्या वेळी केली जाते. तसेच तस्करी करणाऱ्या गाडी चालकांकडे हत्यारे देखील असतात. अशा गाडयांना पडकण्यासाठी गोरक्षक देखील जाळ टाकतात आणि त्यांना पकडून गायींची सुटका करतात. खरं तर गौतस्करी आणि अवैध कत्तलखाने हा मोठा आर्थिक व्यवसाय आहे, ज्यामध्ये मोठ्या टोळ्या आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती सामील असतात. गोरक्षकांच्या कारवायांमुळे या व्यवसायाला धोका निर्माण होतो, ज्यामुळे गोरक्षकांना धमक्या किंवा हल्ल्यांचा सामना करावा लागतो. तसेच अनेकदा गोरक्षकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम देखील ठेवली जाते. काही भागांत गौतस्करीला स्थानिक नेत्यांचे किंवा गुन्हेगारी टोळ्यांचे समर्थन असते, जे गोरक्षकांना लक्ष्य करतात.
गोहत्या रोखण्यासाठी हे गोरक्षक आपल्या जीवाची बाजी लावत असतांना त्यांच्यावर हल्ले होणे हे निंदाजनक आहे. गोरक्षक कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची माहिती संबंधित पोलिसांना देत असतात, पण ते वेळेवर येत नसल्याने गोरक्षक स्वतः पुढाकार घेत आहेत. अशातच त्यांना टार्गेट केले जाते त्यामूळे आता त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या मोठा प्रश्न बनत चालला आहे.