२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी फक्त हिंदू पर्यटकांना लक्ष करत गोळ्या घातल्या. ज्यानंतर देशातूनच नाही तर जगभरातून या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आला. देशात ठीक-ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये काही चकित करणारे व्हिडिओ आहेत. जे देशाला विचार करण्यास भाग पडतात. सध्या सोशल मीडियावर आसाममधील एका व्लॉगरचे एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. एकीकडे पहलगाम हल्ला आणि दुसरीकडे आसाममधील व्लॉगरचे व्हिडिओ…नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
पहलगामध्ये पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर मधील स्थानिक या घटनेचा विरोध करताना दिसले. तसेच काही स्थानिक पर्यटकांच्या मदतीसाठीही धावून पुढे आले. व आम्ही पर्यटकांसोबत आहोत…जो पर्यंत पर्यटक काश्मीरमध्ये आहेत ते आमची जबाबदरी आहेत असंही काश्मीरमधील स्थानिकांकडून सांगण्यात आल्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले.
पहलगाम मध्ये हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मिरी स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा देखील काढला, तसेच एक भारतीय म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो असे म्हणणाऱ्या काश्मिरी स्थानिकांचे व्हिडिओ देखील आपण पाहिले. पण जेव्हा आसाममधील व्लॉगरने काश्मीरमध्ये जाऊन स्थानिकांशी चर्चा केली तेव्हा परिस्थिती काही वेगळीच समोर आली.
पहलगाम हल्ल्यानंतर २८ एप्रिल रोजी आसाममधील बोडो व्लॉगरने एक व्लॉग आपल्या चॅनेलवर पोस्ट केला जो तुफान व्हायरल झाला. या व्लॉगरने तेथील एका काश्मिरी ऑटो चालकाला काही प्रश्न विचारले असता “काश्मीर भारताचा भाग नाही” असा दावा त्या ऑटो चालकाने केला.
जेव्हा व्लॉगरने पहलगाममध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल त्या ड्रायव्हरला विचारले तेव्हा त्याने या प्रकरणावर काहीही बोलणार नकार दिला. पुढे जेव्हा व्लॉगरने विचारले तुम्ही भारतीय आहात का? तेव्हा देखील ड्रायव्हर ‘आम्ही काश्मीरमध्ये राहतो, भारतात नाही.’ काश्मीर भारताचा भाग नाही. असं म्हणत तो तिथून निघून गेला.
बोडो व्लॉगरचा हा एकच व्हिडिओ नाही तर त्याने अनेक कश्मिरी स्थानिकांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा देखील कश्मिरी नागरिकांकडून आम्ही भारताचा भाग नाही आम्ही कश्मिरी आहोत. असं सांगण्यात आलं. एकीकडे कश्मिरी लोक हल्ल्याचा निषेध करताना दिसत आहेत पण स्वतःला भारतीय म्हणून घ्यायला तयार नाहीत.
फक्त बोडो व्लॉगरच नाही तर तिथे फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांनी पहलगाम हल्ल्यानंतर कश्मिरी स्थानिकांशी चर्चा केली ज्यानंतर कश्मिरी स्थानिकांची मानसिकता काय आहे हे सर्वांसमोर आले. काही स्थानिक असेही होते. जे हल्ल्यावेळी पर्यटकांना वाचवण्यासाठी जास्त पैशांची मागणी करत होते.
🚨🚨: Local 'Kashmiriyat' EXPOSED – a local says "Kashmir not part of India" amidst the #PahalgamTerroristAttack;
👇🏼: Read more
On April 28, a Bodo vlogger from Assam posted a vlog that went viral, sparking outrage after a Kashmiri auto driver claimed, “Kashmir is not part of… pic.twitter.com/Rt7knOyPp4
— truth. (@thetruthin) April 29, 2025
एकीकडे कश्मिरी नागरिक जरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असतील पण दुसरीकडे मात्र, या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तान विरोधात एकही शब्द बोलण्यास तयार नाहीत. ज्या काश्मिरमध्ये गेल्या कित्येक काळापासून भारतीय सुरक्षा दल तैनात आहेत. ज्यांना भारतातून सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. तेच कश्मिरी स्वतःला भारतीय म्हणण्यास तयार नाहीत. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात आंदोलने करण्यात आली. पण जिथे हा हल्ला झाला त्या काश्मीरमध्ये एकही आंदोलन झाले नाही. तसेच तेथील सरकाराला नागरिकांकडून एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. ही चकित करणारी बाब आहे.
अशास्थितीत सोशल मीडियावर आम्ही पर्यटकांसोबत आहोत असे व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त दाखवण्यासाठी आहेत की काय? असे अनेक प्रश्न आता पडत आहेत. ही या हल्ल्याच्या नंतरची एक छोटीशी स्टोरी असली तरी देखील सरकारसमोर मोठे प्रश्न उस्थितीत करणारी आहे.