एकदा परदेश दौ-यात असताना स्वामी विवेकानंदांना पाश्चात्त्य श्रोत्यांनी रामायणाच्या अस्तित्वाबद्दल विचारले, त्या वेळी त्यांनी उत्तर देताना रामायणाचा गौरवोल्लेख हा ‘भारताचा सांस्कृतिक इतिहास’ असा केला! विवेकानंदांचे ते उद्गार आजही सार्थक वाटतात. कारण आजही भारताच्या हिमालयापासून ते आसेतू टोकापर्यंत कणाकणात श्रीराम आहेत. हिंदू धर्मात भगवान श्रीराम यांना महत्वाचे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत भगवान श्रीराम हे मर्यादा ‘पुरुषोत्तम’ म्हणून पूजले जातात. रामायण हे त्यांचे जीवन आणि आदर्शांचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात रामाला किती मोठे महत्व आहे हे माहित असताना देखील काँग्रेस प्रिन्स राहुल बाबांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात आयोजित वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्स या परिसंवादात भाग घेतला होता. याठिकाणी त्यांनी हिंदूंचे दैवत असलेले प्रभू राम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा एकदा हिंदू संस्कृतीवर हल्ला केला आहे.
https://x.com/IamTheStory__/status/1918912172064641443
काय बोलले राहुल गांधी ?
राहुल गांधींना वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्स या परिसंवादात प्रश्न विचारण्यात आला होता की, हिंदू राष्ट्रवादाचे वर्चस्व असलेल्या युगात सर्व समुदायांना सामावून घेणारे धर्मनिरपेक्ष राजकारण कसे तयार केले पाहिजे? यावर राहुल गांधी म्हणाले की, ‘आपल्या सर्व पौराणिक व्यक्तिरेखा, भगवान राम अशाच प्रकारचे होते. ते क्षमाशील होते, ते दयाळू होते. भाजप ज्याला हिंदू विचार म्हणतो त्याला मी अजिबात मानत नाही. मी हिंदू विचार अधिक बहुलवादी, अधिक प्रेमळ, अधिक सहिष्णु आणि खुले मानतो. प्रत्येक राज्यात आणि समुदायात असे लोक आहेत जे त्या विचारांसाठी उभे राहिले, त्या विचारांसाठी जगले आणि त्या विचारांसाठी मरण पावले. गांधीजी त्यापैकी एक आहेत. माझ्या मते, लोकांविरुद्ध द्वेष आणि राग भीतीतून येतो. जर तुम्ही घाबरत नसाल तर तुम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, भाजपाची संकल्पना हा हिंदू विचार आहे, असे मी मानत नाही. विचासरणीच्या बाबतीत ते अतिशय क्षुल्लक आहेत. आता त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे या सत्तेतून त्यांना अमर्याद अशी संपत्ती आणि शक्ती प्राप्त झाली आहे. परंतु ते बहुसंख्य भारतीय विचारवंतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.’ असे उत्तर राहुल गांधी यांनी यावेळी दिले.
यावेळी उत्तर देताना मात्र, राहुल गांधी यांनी हिंदूंच्या आस्थेवर घाला घालत प्रभू श्री राम यांना पौराणिक पात्र म्हणून संबोधले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली तसेच त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत केले पाहिजे असेही आवाहन करण्यात आले.
ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका
ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करा असे आवाहन केले आहे. बद्रीनाथ येथील शंकराचार्य आश्रमात पत्रकारांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत मनुस्मृतीबाबत केलेल्या विधानामुळे सनातन धर्माचे सर्व अनुयायी दुखावले आहेत. याप्रकरणी त्यांना तीन महिन्यांपूर्वी एक नोटीस देखील पाठवण्यात आली होती ज्यामध्ये त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी अजूनही यावर कोणतेही उत्तर दिले नाही किंवा माफीही मागितली नाही.
राहुल गांधींचे मनुस्मृतीबाबत संसदेत केलेले वक्तव्य ताजे असताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केले आहे. जर एखादी व्यक्ती सतत हिंदू धर्मग्रंथांचा अपमान करत असेल व स्पष्टीकरण देण्यास देखील टाळाटाळ करत असेल तर त्याला हिंदू धर्मात स्थान देता येत नाही.” अशी प्रतिक्रिया स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली आहे.
पुढे स्वामी अविमुक्तेश्वरानंद असेही म्हणाले की, ‘राहुल गांधींना मंदिरांमध्ये विरोध केला पाहिजे आणि पुजाऱ्यांना त्यांची पूजा करू नये कारण त्यांना आता स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार नाही.’
https://x.com/SamarRaj_/status/1918967227115606389
आता राहुल गांधींचे कोणत्याही धर्मावर अशाप्रकारे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही धर्मावर वादग्रस्त विधाने करत देशात वाद निर्माण केला आहे. २०२४ च्या अमेरिका दौऱ्यात देखील त्यांनी शीख समुदायावर वक्तव्य केले होते.
त्यांनी जॉर्जटाउन विद्यापीठात शीख समुदायावर वक्तव्य करून देशातील वातावरण भडकवले होते. देशातील प्रत्येकाला समान संधी मिळू शकेल का? या प्रश्नावर ते म्हणाले होते की, ‘भारतातील शीख समुदायामध्ये त्यांना पगडी आणि कड घालण्याची परवानगी दिली जाईल की नाही याबद्दल चिंता आहे.’ राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर देशात शीख समाजातील लोकांकडून निदर्शने देखील करण्यात आली होती.
पुरोगामी पक्षाची भूमिका
राहुल गांधींचं नाही तर दक्षिण भारतातील अनेक पुरोगामी राजकारणी देखील हिंदूच्या श्रद्धा स्थानांवर बेताल वक्तव्य करून आपला पुरोगामी पणाचा कंड शमवून घेताना दिसले आहेत. मागे एकदा असंच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यावर वक्तव्य करत हिंदू आस्थेवर घाला घातला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, ‘आमचा राम मांसाहारी होता’.
पुरोगामी पक्ष नेहमीच प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करत आलाय. व वादग्रस्त विधाने करताना दिसला आहे. प्रत्यक्षात याआधी राहुल गांधी आपल्याला हवा तसा सोयीस्कर पद्धतीने आणि मुख्यत्वे मतांसाठी हिंदू धर्माचा वापर करताना अनेकदा दिसले आहेत. अश्या वेळी दत्तात्रेय गोत्राचे ब्राह्मण म्हणून मिरवत असताना राहुल गांधीना जराही लाज वाटत नाही. आता तरी राहुल गांधींनी आणि तत्सम भंपकगिरी करणाऱ्या लोकांनी शहाणं होत हिंदूंच्या श्रद्धस्थानवर टीका कारण थांबवलं पाहिजे, अन्यथा हिंदूंच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल.