Pakistan Cyber Attack on India: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता यासंबंधीचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे. महत्वाचे म्हणजे भारताने पाकिस्तानविरोधातले हे निर्णय जाहीरपणे घेतले आहेत. पाकिस्तान मात्र षडयंत्र पद्धतीने भारतावर कारवाई करत आहे, असे म्हणावे लागेन. कारण भारताने पाकिस्तानविरोधात सायबर युद्धाचे नवे रणांगण उघडले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात उघडलेल्या या नवीन सायबर युद्धाची सविस्तर माहिती आपण या लेखातून घेऊयात.
एखाद्या देशावर सायबर हल्ला करणे नेमके काय:
एखाद्या देशाच्या संगणकीय प्रणालीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून तांत्रिक बिघाड निर्माण करणे किंवा माहिती चोरणे किंवा ती माहिती नष्ट करणे म्हणजे सायबर हल्ला करणे. बहुतांश वेळा एखादा देश दुसऱ्या देशावर सायबर हल्ला करताना सरकारी यंत्रणा, बँका, आरोग्य सेवांचे डेटा सेंटर्स, शिक्षण संस्था आणि खासगी उद्योगांवर सायबर हल्ले करतो, म्हणजेच संबंधित देशाची माहिती एखाद्या उद्देशाने चोरतो.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर झालेले सायबर हल्ले:
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विविध देशांतील हॅकिंग गटांनी भारताच्या सायबर प्रणालींवर १० लाखांहून अधिक ऑनलाइन हल्ले केल्याची नोंद सायबर विभागाने दिली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त महासंचालक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या वेबसाइट आणि पोर्टलवर हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून करण्यात आले आहेत. या हल्ल्यातील बहुतांश हल्ले हे पाकिस्तानने केले आहेत. या हल्ल्यांपैकी अनेक हल्ले अयशस्वी ठरल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. हल्ले करणारे लोक इस्लामी कट्टरपंथीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🚨 MAJOR CYBER ATTACK! Pakistan-linked hackers TARGET Indian defence systems.
MP-IDSA & Military Engineering Service breached amid rising border tensions. pic.twitter.com/8oQB29AhlH
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 5, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांपैकी महत्वाचे सायबर हल्ले:
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील हॅकर्सनी भारतीय लष्करी वेबसाइट्स आणि डेटाबेसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हॅकर्सनी शाळा आणि माजी सैनिकांशी संबंधित साइट्सवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
– पहलगाम हल्ला झाल्यानंतर लगेचच म्हणजे २५ एप्रिल रोजी भारतातील आर्मी काॅलेज ऑफ नर्सिंगची वेबसाइट हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी भारताच्या वेबसाइटवरून धार्मिक भावना भडकावणारी एक पोस्ट केली. हॅकर्सनी लिहिले होते की, “आमचा धर्म, चालरिती एकमेंकापासून दूर आहेत, आम्ही मुस्लिम आहोत आणि तुम्ही हिंदू. आमचा अल्लाह आमच्यासोबत आहे. तुमचा धर्म मात्र तुम्हाला वाचवू शकणार नाही, तुमचा धर्म तुमच्या मृत्यूचे कारण असेल, आम्ही खूप शक्तिशाली आहोत.” हा मजकूर हॅकर्सनी इंग्लिश आणि उर्दुमध्ये लिहिला होता.
– २९ एप्रिलला राजस्थानच्या शिक्षण विभागाची वेबसाइट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. राजस्थानच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर हॅकर्सनी भारतीय प्रशासनाची खिल्ली उडवणारी एक पोस्ट केली होती. याच वेबसाइटवर हॅकर्सनी पहलगाम हल्ल्यावरून देखील मजकूर लिहिला. हा मजकूर असा होता की, “तुम्ही आग लावली त्यामुळे विघटनाची तयारी ठेवा. कुठल्या सीमा नाहीत, इशार नाही आणि दयाही नाही. पुढील हल्ला गोळ्यांचा नसेल तर बाइट्सचा असेल.”
– पाकिस्तानी हॅकर्सने श्रीनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलची वेबसाइट देखील हॅक केली होती. तसेच हॅकर्सने पहलगाम हल्ल्यानंतर रानीखेतच्या आर्मी पब्लिक स्कूलचीही वेबसाइट हॅक केली होती. या दोन्ही आर्मी स्कूलच्या वेबसाइटवरही हॅकर्सने आक्षेपहार्य पोस्ट केली होती.
– विशेष म्हणजे भारताच्या आर्मी वेलफेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन डेटा चोरण्याचा देखली हॅकर्सने प्रयत्न केला होता
– भारताच्या माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या वेबसाइटवर एका वेगळ्या सायबर हल्ल्यात हल्ला झाला आहे.
-आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि भारतीय हवाई दलाच्या माजी सैनिकांच्या वेबसाइट देखील हॅकर्सने निशाण्यावर घेतल्या होत्या. अशाप्रकारे पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानकडून अनेक सायबर हल्ले झाले आहेत
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ला करण्याचा काय उद्देश आहे:
पाकिस्तानकडून होत असलेल्या या सायबर हल्ल्यांमागे राजकीय उद्दिष्टे, फसवणूक आणि भारताच्या महत्त्वपूर्ण माहिती प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानकडून केले जाणारे हल्ले हे राजकीय आणि रणनीतिक उद्देशांवर आधारित असल्याचे दिसत आहे. या हल्ल्यांद्वारे भारतीय सरकारच्या गुप्त यंत्रणांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याच देखील दिसत आहे. तसेच साइट्स हॅक करून त्यावर धार्मिक मजकूर लिहिणे, यामागे सामाजिक अस्थिरता पसरवण्याचा हेतू दिसत आहे. अर्थातच पाकिस्तान हे भारताने केलेल्या कारवाईचा बदला म्हणून करत आहे. आता भारताकडून हॅकर्स करणाऱ्या गटांचे मूळ नेटवर्क शोधण्याचे काम सुरू आहे.