Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

News Desk by News Desk
May 30, 2025, 10:11 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Elon Musk Donald Trump :डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योगपती एलाॅन मस्क यांचा महत्वाचा वाटा आहे असे म्हटले गेले. कारण मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. तसेच ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर एलाॅन मस्क यांना अमेरिकन सरकारमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. अर्थातच ट्रम्प यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी'(DOGE)ची स्थापना करत त्याच्या प्रमुखपदी एलाॅन मस्क यांची नियुक्ती करत नोकरशाहीमध्ये अमूलाग्र सुधारणा करून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याची जबाबदारी  मस्क यांच्यावर सोपवली.

-तेव्हापासून गेली १३० दिवस एलाॅन मस्क यांनी विविध निर्णय घेत आपली जबाबदारी सांभाळली.

-परंतु २९ मे रोजी एलाॅन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडल्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतची माहिती स्वत: एलाॅन मस्क यांनी एक्सवरती पोस्ट दिली आहे.

मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आहे. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. डीओजीई मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल. कारण ते सरकार चालवण्याचा एक मार्ग बनले आहे.”

ट्रम्प प्रशासनातील एलाॅन मस्क यांचा प्रवास कसा राहिला:

-जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी( डीओईची) स्थापना केली आणि एलाॅन मस्क यांची प्रमुखपदी निवड केली तेव्हा एलाॅन मस्क यांनी अमेरिकन जनेतला सरकारी खर्च कमी करण्याचे, अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज कमी करण्याचे आणि संघीय तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले होते.

-मस्क यांनी आपले आश्वासन पूर्ण करताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे मस्क यांना अमेरिकन जनतेच्या विरोधाला देखील सामोरे जावे लागले.

-एलाॅन मस्क यांनी अमेरिकेकडून विविध देशांना मदत देणाऱ्या सरकारी संस्था ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट'(USAID)चे अनेक कार्यक्रम बंद केले.

– मस्क यांनी अमेरिकन सरकारचा खर्च कमी करण्यासाठी अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद केले त्यामुळे सुमारे २ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना आपल्या सरकारी नोकऱ्या गमवाव्या लागल्या. एकंदरित मस्क यांनी १२ टक्क्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. मस्क यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर सरकारी कार्यक्षमता विभागावर अपारदर्शक आणि मनामानी पद्धतीने काम करण्याच आरोप केला होता तसेच त्यांच्या विरोधात खटलेही दाखल करण्यात आले होते.

– खरेतर डीओजीई हा अधिकृत सरकारी विभाग नाही परंतु तरीदेखील मस्क यांच्या DOGE टीमने अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन सारख्या डेटा सिस्टीममध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

– फेब्रुवारीमध्ये २०२५ मध्ये ‘प्यू सर्व्हे एजन्सी’ने केलेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकन जनेतची एलाॅन मस्क यांच्याविषयी असेलेली नकारात्मकता स्पष्टपणे दिसून आली. प्यू सर्व्हे एजन्सीच्या सर्वेक्षणानुसार ५४ टक्के लोकांनी मस्क याच्या भूमिकेकडे नकारात्मक दृष्टीने तर ३७ टक्के लोकांनी त्यांच्या भूमिकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, असे दिसून आले.

– विशेष म्हणजे मस्क यांच्या ट्रम्प प्रशासनातील भूमिकेवर केवळ जनता आणि विरोधी पक्ष म्हणजेच डेमोक्रॅटिक पक्षच नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन सरकारमधीलही अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही मस्क यांच्या निर्णयाचा विरोध केला होता. खरेतर डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे नेते आणि रिपब्लिकन सरकारचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि एलोन मस्क यांच्यात परराष्ट्र व्यवहारांवरून संघर्ष झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.

– एप्रिलमध्ये लाखो अमेरिकन लोकांनी मस्क यांच्या भूमिकेविरूद्ध निदर्शने केली होती.

– मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील जबाबदारी स्विकारल्यानंतर असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता की, एलाॅन मस्क त्यांच्या भूमिकेमुळे दरवर्षी सरकारी खर्च दोन ट्रिलियन डॉलर्सने कमी होईल. परंतु सरकारी कार्यक्षमता विभागाच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, २७ मे पर्यंत अमेरिकन सरकारी खर्चातील कपात आतापर्यंत १७५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच मस्क यांच्याकडून २ ट्रिलियन डॉलर्स वाचवण्याची अपेक्षा होती त्यापैकी मस्क ८.५ टक्के बचत करण्यात यशस्वी ठरले आहेत

ट्रम्प मस्क यांचे संबंध?

-खरेतर २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्पवर टीका केली होती आणि त्यांनी म्हटले होते की, ट्रम्प अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती नाहीत. तर २०२० मध्ये मस्क यांनी जो बायडेन यांना पाठिंबा दिला होता. २०२२ मध्ये ट्रम्प यांच्याशी मस्क यांचे काही जोरदार वादविवाद झाले. त्यानंतर २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एलाॅन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आणि ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारावर $277 मिलियन पेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती उपलब्ध आहे.

– ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मस्क यांना २० जानेवारी २०२५ पर्यंत प्रशासनात विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले आणि मस्क यांनी कशाप्रकारे ट्रम्प प्रशासनात काम केले याची माहिती आपण वरती घेतलेली आहे.

आता ट्रम्प मस्क यांच्यात काही बिनसले आहे का?

-मस्क यांनी डीओईजी प्रभारी पदावरून राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंधांमध्ये ठिणगी पडल्या असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

– कारण नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी बिग ब्यूटीफूल विधेयकाचा प्रस्तान मांडला आहे. या विधेयकामध्ये अमेरिकेतून जगभरातल्या विविध देशांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या पैशांवर म्हणजे इंटरनॅशनल मनी ट्रान्सफरवर 5 टक्के टॅक्स लावण्याचा प्रस्ताव आहे.

-मात्र ट्रम्प यांच्या बहुचर्चित ‘बिग ब्युटीफुल बिल ‘ विधेयकावर मस्क यांनी जाहीरपणे टीका केली होती. मस्क यांनी ट्रम्प विधेयकाबद्दल बोलताना ‘मोठ्या प्रमाणात खर्चाचे विधेयक’  असे म्हटले होते. या विधेयकामुळे संघीय तूट वाढेल तसेच मस्क यांच्या विभागाने केलेले काम कमकुवत होईल, असे मत मस्क यांनी व्यक्त केले होते. त्यातच मस्क सरकारी खर्च कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनात सामील झाले आहेत त्यामुळे मस्क यांच्या दृष्टिकोणातून हे विधेयक मस्क यांच्या उद्दिष्टाच्या विरोधात आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी या विधेयकाला सर्वात सुंदर विधेयक म्हटले तर मस्क यांनी या विधेयाकला खर्चिक म्हटल्याने दोघांमधील मतभेत दिसून येतात.अर्थातच या विधेयकावर दोघांमध्ये वैचारिक संघर्ष निर्माण झाल्याने मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाला रामराम ठोकल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

मस्क ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यापासून टेस्ला कारच्या विक्रित लक्षणीय घट:

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यापासून आणि ट्रम्प यांना जाहीरपणे पाठिंबा दिल्यापासून मस्क यांच्या व्यावसायावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. कारण अमेरिकन सरकारच्या खर्चात कपात करण्याच्या  नादात मस्क यांनी अनेक निर्णय घेत जगभरातून नाराजी ओढावून घेतली असे काहींचे म्हणणे आहे. तसेच ट्रम्प यांनी अनेक देशावर कर लादल्याच्या निर्णयाचा फटका मस्क यांच्या टेस्ला कंपनीला बसला असे दिसून येत आहे. कारण मस्क ट्रम्प प्रशासनात असताना जगभरात विविध ठिकाणी टेस्लाच्या कार विक्री केंद्र व कार्यालयाबाहेर विरोध प्रदर्शने भरवली जात होती .फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तर आंदोलकांनी टेस्लाच्या गाड्यांना आग लावून टाकल्याच्या घटना देखील पाहायला मिळाल्या होत्या.

– गेल्या काही महिन्यात टेस्लाच्या गाड्यांच्या विक्रीत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे टेस्लाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

-मस्क ट्रम्प प्रशासनात सहभागी झाल्यानंतर टेस्लाचे शेअर्स ४५ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु गेल्या काही दिवसांत टेस्लाच्या शेअरमध्ये पुन्हा सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

-असे असले तरी ट्रम्प यांना साथ दिल्यापासून मस्क यांना त्यांच्या दुसऱ्या कंपन्यामधून चांगलाच नफा मिळाल्याची माहिती उपलब्ध आहे.

– उपलब्ध माहितीनुसार, मस्क हे ट्रम्प प्रशासनात सामील झाल्यापासून त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. कारण जुलै २०२४ मध्ये मस्क यांनी संपत्ती २५० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होती तर मस्क यांची आता संपत्ती ४१९ अब्ज डॉलर्स आहे. अर्थातच गेल्या काही महिन्यात
मस्क यांच्या संपत्ती १७० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे.

मस्क यांच्यानंतर डीओजीई विभाग बंद पडेल:
खरेतर मे महिन्याच्या सुरवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाले होते. त्यावेळी मस्क यांनी माध्यमांशी बोलताना सल्लागार पदावरून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी ट्रम्प यांना त्यांच्यानंतर डीओजीईचे नेतृत्व कोण करेल असे त्यांना विचारण्यात आले, तेव्हा मस्क म्हणाले होते की, बुद्ध गेल्यानंतरही ज्या प्रमाणे बौद्ध धर्म चालू राहिला त्याप्रमाणे डीओजीईही माझ्याशिवाय चालू राहील.

-तसेच ट्रम्प यांनी डीओजीई विभागाला जुलै 2026 पर्यंत त्यांचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे आणि या विभागाचे उदिष्टही अद्याप साध्य झालेले नाही. त्यामुळे मस्क यांच्यानंतर त्यांच्या जागेवर इतर कोणाचीही नियुक्ती करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.

दरम्यान, आता या सगळ्यानंतर ट्रम्प यांची प्रतिक्रया काय येईल, ट्रम्प मस्क यांचे संबंध कसे राहतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: america big newsDonald Trumpdonald trump elon musk relationdonald trump newselon muskTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा
देश विदेश

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली
गुन्हेविश्व

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.