कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
कंगना राणावत बऱ्याचदा बाॅलिवूड कलाकारांवर टिका करताना दिसते.कंगना राणावत हिच्या यावेळी निशाण्यावर साऊथ स्टार प्रकाश राज हे आहेत प्रकाश राज यांनी गृहमंत्री अमित शाह यांना टार्गेट करत एक पोस्ट शेअर केली. मात्र, आता प्रकाश राज यांना ही पोस्ट शेअर करणे महागात पडल्याचे दिसत आहे. कंगना राणावत हिने प्रकाश राज यांचा याच पोस्टवरून चांगलाच समाचार घेतला आहे.
अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त म्हटले होते की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील भाषांच्या विविधतेला जोडणारे नाव हिंदी आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत हिंदीने आपल्या देशाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.मात्र या विधानांवर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी तुम्ही हिंदी बोलता कारण तुम्हाला हिंदीच येते. तुम्ही आम्हाला देखील हिंदी बोलायला सांगता कारण तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदी येते. हिंदी दिवस बंद करा, हिंदी सर्वांवर लादणे बंद करा, हिंदीचे वर्चस्व थांबवा. असे सोशल मीडियावर लिहिले होते.
मात्र प्रकाश राज यांची ही पोस्ट रिशेअर करत कंगना राणावत हिने म्हटले आहे की, अमित शहा हे गुजराती आहेत आणि त्यांची मातृभाषा देखील गुजराती आहे.