कॅलिफोर्निया : 2024 च्या हॉलिवूड पुरस्कार सीझनची सुरुवात या वर्षीच्या गोल्डन ग्लोब समारंभाने झाली आहे. तर यंदाच्या वर्षी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ ने 5 पुरस्कार जिंकले आहेत.
मार्गोट रॉबीच्या ‘बार्बी’ने सिनेमॅटिक आणि बॉक्स-ऑफिस यशासाठी पहिला-वहिला गोल्डन ग्लोब जिंकला आहे. तर गायक बिली आयलीश आणि तिचा भाऊ फिनीस ओकॉनेल यांनाही ‘बार्बी’मधील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर’ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब मिळाला आहे.
कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोल्डन ग्लोबच्या 81व्या आवृत्तीचे आयोजन स्टँडअप कॉमेडियन जो कोय यांनी केले होते.
2024 गोल्डन ग्लोब विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, ड्रामा – ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, म्युझिकल किंवा कॉमेडी – पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर, अॅनिमेटेड – द बॉय अॅण्ड द हॅरोन
सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट – बार्बी
मोशन पिक्चर, ड्रामामधील अभिनेत्रीची सर्वोत्कृष्ट कामगिरी
लिली ग्लॅडस्टोन – किलर्स ऑफ द फ्लॉअर मुन
मोशन पिक्चर, ड्रामामधील अभिनेत्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी
सिलियन मर्फी- ओपेनहायमर
मोशन पिक्चर, म्युझिकल किंवा कॉमेडीमध्ये अभिनेत्रीची सर्वोत्तम कामगिरी
एम्मा स्टोन – पुअर थिंग्स
मोशन पिक्चर, म्युझिकल किंवा कॉमेडीमधील अभिनेत्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी
पॉल गियामट्टी – द होल्डओव्हर्स
रॉबर्ट डाउनी जूनियर – ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, मोशन पिक्चर
ख्रिस्तोफर नोलन – ओपेनहायमर
सर्वोत्कृष्ट पटकथा, मोशन पिक्चर
जस्टिन ट्रायट आणि आर्थर हरारी – अॅनटॉमी ऑफ अ फॉल
सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर, मोशन पिक्चर
लुडविग गोरानसन – ओपेनहायमर
सर्वोत्कृष्ट मूळ गाणे, मोशन पिक्चर
व्हॉट वॉज आय मेड?,” – “बार्बी”
सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका, नाटक – सक्सेशन
सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका, संगीत किंवा विनोदी – द बिअर
सर्वोत्कृष्ट मर्यादित मालिका, अँथॉलॉजी मालिका किंवा टेलिव्हिजनसाठी बनवलेले मोशन पिक्चर – बिफ
टेलिव्हिजन मालिका, नाटकातील अभिनेत्रीची सर्वोत्कृष्ट कामगिरी
सारा स्नूक – सक्सेशन