मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तेव्हापासून अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर लक्षद्वीप आणि पीएम मोदींच्या समर्थनात दिसत आहेत. अक्षय कुमार, सलमान खान, रणवीर सिंग, कंगना रणौत, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी मालदीववर बहिष्कार टाकण्याची आणि लक्षद्वीपसारख्या आपल्याच देशातील सुंदर भागांना भेट देण्याबाबत बोलायला सुरुवात केली आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्याचे कौतुक करताना या स्टार्सनी येथील पर्यटन वाढविण्याबाबत सांगितले आहे.
बॉलिवूड स्टार्सनी ट्विट करून लोकांना आवाहन करत पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे. यात अक्षयकुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर आणि जॉन अब्राहम यांसारखे अनेक सेलिब्रिटी आहेत. ट्विट करून, बॉलीवूड सेलिब्रिटी लोकांना परदेशात जाण्यापेक्षा आणि भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यास सांगत आहेत.
यामध्ये जॉन अब्राहमने ट्वीट करत लिहिले की, ‘लक्षद्वीप हे आश्चर्यकारक भारतीय आदरातिथ्य आहे, अतिथी देवो भवची कल्पना आणि विशाल सागरी जीवनाचा शोध घेऊन भेट देण्यासारखे ठिकाण आहे.’
तर अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ट्वीट करत लिहिले की, ‘हे सर्व फोटो मला लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढवणारे आहेत. लक्षद्वीपमध्ये असा प्राचीन समुद्र किनारा आहे जो स्थानिक संस्कृतीशी समृद्ध आहे. मी आता फक्त सुट्टीची प्रतीक्षा करत आहे. यावर्षी #एक्सप्लोरइंडियनआईलैंड्स का नाही?’
दरम्यान, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि उर्वशी रौतेला यांसारख्या अभिनेत्रींनी लक्षद्वीपचे सुंदर फोटो शेअर करून त्याची तुलना मालदीवशी केली आहे.