विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाचा निकाल दिला. या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. तसेच शिंदे गटाचे व ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. मात्र या निकालामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. त्याबाबत ठाकरे गट आजच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप अधिकृत असल्याचे मान्य केले. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मनात आले म्हणून ठाकरे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करू शकत नाही अशी टिपण्णी अध्यक्षांनी केली आहे. तसेच गटनेत्याला काढण्याचे अधिकार हे पक्षाच्या कार्यकारिणीला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे खरी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे आता शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हातातून निसटला आहे. मात्र अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गट आजच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.