सध्या “बिहू रे- नशा सा लागे” हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला नेटकऱ्यांनी तुफान असा प्रतिसाद दिला आहे. तसेच हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासांमध्ये त्याला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे लिरिक्स तनवीर गाझीने लिहिले असून राणी हजारिका यांनी हे गाणे गायले आहे. तर आता सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या गाण्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलेच आहे पण सोबतच या गाण्याच्या व्हिडीओमधील बेली डान्सने सर्वांना भूरळ घातली आहे. त्यामुळे या गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे आसामच्या तरूणांनी या गाण्यावर क्रिएटिव्ह असे रील्स देखील बनवले आहेत. हे गाणे जान निसार लोन यांनी दिग्दर्शित केले आहे. तर जान निसार लोन आणि रंजना बरुआ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.
या गाण्याची गायिका राणी हजारिका हिने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “तुम्ही हे गाणे ऐकण्यासाठी आणि त्यावर तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी खूप उत्साही असून या खास क्षणाची मी वाट पाहू शकत नाही!”
“बिहू रे-नशा सा लागे” हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #NewMusic आणि #BihuReNashaSaLaage हा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावरील या ट्रेंडवरून हे स्पष्ट होत आहे की, या गाण्याने फक्त आसाममधील लोकांनाच आकर्षित केले नाही तर जगभरातील संगीतप्रेमींची मनेही जिंकली आहेत.
दरम्यान, राणी हजारिका आणि एआर म्युझिक स्टुडिओ, ज्यांना आर्म्स रेकॉर्ड लेबल म्हणूनही ओळखले जाते, या दोघांच्याही मोठ्या यशात मंत्रमुग्ध करणारा फ्यूजन ट्रॅक, “बिहू रे – नशा सा लागे” ने इंटरनेटवर तुफान प्रतिसाद मिळवला आहे. हे गाणे केवळ 24 तासात दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.