मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन मैदानांची मागणी केली आहे. जवळपास तीन कोटी किंवा त्या आसपास मराठे मुंबईत येणार असे जरांगे यांचे म्हणणे आहे. मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फौजदारी रिट याचिकेवर २२ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणसंदर्भातील आंदोलन पुन्हा एकदा सुरु होणार आहे. हे आंदोलन मुंबईत करण्याचा त्याणी ठरवले आहे. तसेच या आंदोलनाची रूपरेषा देखील त्यांनी सांगितली आहे. जवळपास तीन कोटी किंवा त्यासपास मराठे मुंबईत येऊन आंदोलन करण्यात असल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. मात्र या आंदोलनाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी मिळू नये साठी सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, २२ तारखेला यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान आता या सुनावणीमध्ये उच्च न्यायालय कोणते निर्देश देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.