कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेमध्ये कथित खिचडी घोटाळ्याचे प्रकरण समोर आले होते. या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. आता सूरज चव्हाण यांनी ईडीच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असून, सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुरज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीच्या अटकेविरोधात सुरज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणत्याही गुन्ह्यात चव्हाण यांचे नाव आरोपी म्हणून नसल्याने ईडीला त्यांना अटक करता येणार नाही असे याचिकेत म्हणण्यात आले आहे.
दरम्यान, १८ जानेवारीला ईडीने खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. सुरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने याआधी सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. आदित्य ठाकरेंची कोणतेही संघटनात्मक रणनीती आखण्यात सुरज चव्हाण यांची महत्वाची भूमिका असते.