मनोज जरांगे पाटलांनी २० जानेवारी रोजी सुरु केलेला मोर्चा आज अखेर पुण्यात दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहे. या आंदोलनासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन जागांची मागणी केली आहे. मात्र अजूनही त्यांना ङोळ्यांसाठी परवानगी मिळालेली नाही . तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान आज दुपारी या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडली आहे.
या सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत राज्य सरकारला खडे बोल सुनावल्याची माहिती समोर येत आहे. हजारो गाड्या, बैलगाड्या आणि ट्रॅक्टर मुंबईत आले तर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद सदावर्ते यांनी न्यायालयात केला आहे. तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून न्यायालयाने राज्य सरकारला अनेक सवाल विचारले. तर जरांगे आतील यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार असल्याची हमी सरकारतर्फे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे. त्यावर आम्हालाही न्यायमंदिरात न्याय मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.