कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण आज (25 जानेवारी) माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री-वरिष्ठ पक्षनेते बीएस येडियुरप्पा आणि बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना कर्नाटकच्या जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना हुबळी-धारवाडमधून तिकीट दिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर पक्षाने त्यांना आमदार केले होते.