मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला होता. त्या लढ्याला यश आले आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून, अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. ”मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिलेला आहे. आंदोलनातील जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असोत, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील. मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा थेट आग लावली आहे. सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, जे काही गुन्हे आहेत ते न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येत नाहीत.”
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोल्ट होते. तेव्हा ते म्हणाले, ”मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे. आंदोलनातील जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असोत, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील. मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा थेट आग लावली आहे. सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, जे काही गुन्हे आहेत ते न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येत नाहीत. त्यामुळे बाकी जे आंदोलनातील गुन्हे आहेत ते आम्ही परत घेऊ.”
तसेच फडणवीस पुढे म्हणाले, ”मला आनंद आहे की सरकारने मराठा आरक्षणावर सकारात्मकता दाखवला आहे. मी मनोज जरांगे पाटील यांचे देखील अभिनंदन करतो की हा जो मार्ग सरकारने काढलेला आहे तो त्यांनी स्वीकारला. हा जो प्रश्न आहे तो कायदेशीर पद्धतीने सोडवावा लागेल हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. यामुळे मराठा समाजाचा प्रश्न देखील सुटणार आहे. तसेच ओबीसी बांधवांवर देखील आम्ही कोणताही अन्याय होऊ दिलेला नाही.”
दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटीलांनी आपले उपोषण स्थगित केले. २० जानेवारीपासून निघालेला अंतरवाली सराटी मधून निघालेला मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचला होता. यावेळी संपूर्ण मोर्चा दरम्यान, सरकारची त्यांच्याशी स्तर चर्चा सुरु होती. अखेर नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. अध्यादेश जरांगे पाटलांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला.