गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार भाजपा आणि शिंदे यांच्या सत्तेमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग झाले. त्यानंतर जास्त संख्याबळ यांच्याकडे असल्याचे आमची राष्ट्रवादी खरी आहे असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. आता राष्ट्रवादी नक्की कोणाची हा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. तसेच आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभेत सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ३१ जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासह सत्तेत सामील झाले. त्याचप्रमाणे अजित पवार देखील महायुती सरकारमध्ये सामील झाले. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना हि एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय डाया होता. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोग लवकरच देण्याची शक्यता आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.