काल अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्याची आज दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अधिकृतरित्या अजित पवार गटाला मिळाले आहे. मात्र शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या सर्व घडामोडींवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात खुलेआम लूटमार सुरु आहे. सर्वांना विकत घेण्याचे काम सुरु आहे. पैसे देऊन शो पाहा, असे वातावरण केंद्र सरकारने निर्माण केल्याचे त्या म्हणाल्या. ठाकरे गटाच्या खासदार आणि नेत्या प्रियांका चतुर्वेदी निवडणूक आयोगावर आपली प्रतिक्रिया देताना, निवडणूक आयोगाबद्दल कमी बोललेलेच चांगले. सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे बहुमताबाबत स्पष्ट असे निरीक्षण दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्या म्हणाल्या. याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत.
तसेच त्या पुढे बोलताना म्हणाल्या, ”महाराष्ट्राची चेष्टा केली जात आहे. सत्तेचा गैरवापर होतोय, घोडेबाजार होत आहे. राज्यात टोळीयुद्ध सुरू आहे, पोलिस ठाण्यांवर हल्ले होत आहेत.” दरम्यान, आपल्या पक्षाबाबत बोलताना त्यांनी सर्व काही असंवैधानिक पद्धतीने होत आहे. शिवसेना स्वबळावर लढत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे हा निर्णय आल्यानंतर शरद पवार गटाने हे स्पष्ट केले की आम्ही या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.