Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

अजित दादांच्या बाबतीत चुकीचा शब्दप्रयोग केला तर त्याला उत्तर द्या – तटकरे

param by param
Feb 12, 2024, 01:57 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे, 11 फेब्रुवारी : अजितदादांवर टिका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. टिकाटिप्पणी करताना भान सोडून बोलत आहेत. दादांवर टिका करण्यासाठी काही पगारी माणसं ठेवली गेली आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना मी सन्मान देतो पण त्यापेक्षा खालच्या स्तरावरील जे पदाधिकारी आहेत ते एकेरी भाषेत दादांना बोलत आहेत. येत्या पुढच्या कालावधीत यापध्दतीने दादांच्या बाबतीत कुणी शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवकांना केले.

एका बाजूला यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे अश्लाघ्य शब्दात टिकाटिपण्णी करायची याच पुण्यनगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजितदादा पवार यांच्यामुळे उभे राहिले नाहीतर ते कधीच उभे राहिले नसते. केवळ आणि केवळ अजितदादा पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीची कार्यालये उभी राहिली आहेत असे ठणकावून सांगतानाच ५३ पैकी ४३ आमदारांचे पाठबळ अजितदादांना का मिळाले. केवळ सत्तेसाठी नाही तर या आमदारांच्या पाठीशी सख्ख्या भावासारखी २५ वर्ष पाठराखण केली आहे. तरुण आमदार निवडून आणले. ही सगळी फळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पक्षाला २५ वर्षे झाली. या वर्षात आपण सगळेच साक्षीदार आहोत. पण २५ वर्षाच्या इतिहासात ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अशी बिरुदावली घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवा शक्ती एकत्र आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले.

ऐतिहासिक निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला अनेक प्रश्न निर्माण करण्याचे काम झाले पण मला विश्वास वाटत होता की, गेली पस्तीस वर्षे अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कणखरपणाची भूमिका बजावत पक्षाला ताकद देण्यासाठी झोकून देऊन काम करत होते त्यामुळेच अजितदादा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

लोकशाहीच्या माध्यमातून आणि बहुमताने आम्ही एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाराष्ट्राला विकसित करावे… अधिक प्रगतीपथावर न्यावे…युवकांचे, महिलांचे प्रश्न सोडवावे यासाठी सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावे हा क्रांतिकारी निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्यामुळे सहा महिन्यात झालेला बदल आपण बघत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

कायद्याच्या कसोटीवर स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. काहीजण टिका करतात अदृश्य शक्तीचा हात पाठीमागे आहे. नैराश्यातून माणसाची मनं ज्यावेळी झपाटतात त्यावेळी कुणावर तरी दोष देण्याची परिस्थिती निर्माण होते असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

२०१९ मध्ये भाजपसोबत जायचं ठरलं होतं परंतु शीर्षस्थ नेतृत्वाने निर्णय बदलला मात्र भाजपला दिलेला शब्द पाळण्यासाठी ‘शब्दाचा पक्का’ म्हणून ओळख असलेल्या अजितदादांनी ती शपथ घेतली व राजकीय सर्वस्व पणाला लावले असा गौप्यस्फोटही सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.

अजित पवार यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आता आपल्याला ही जबाबदारी घेऊन काम करायचे आहे असे सांगतानाच अजितदादा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तुमच्यामुळे मी फिरू शकलो याचा अभिमान असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आता महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी उभे राहायचे आहे. त्यासाठीच ही युवकांची शक्ती एकत्रित आली आहे. २५ हजारांची ही शक्ती एका हाकेसरशी दादांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तुम्ही प्रत्येकजण शंभराजणांशी संपर्क केलात तर पंचवीस लाख युवकांपर्यत पोचू शकाल आणि पंचवीस लाखातील प्रत्येकाने चार युवकांशी संपर्क केलात तर महाराष्ट्रातील एक कोटी युवकांची ताकद अजितपर्व जे आपण नवीन पर्व घेऊन कामाला सुरुवात केली आहे त्याच्यापाठीमागे उभी राहिल. दाखवून देऊया या महाराष्ट्रात आता नवीन अजित पर्व सुरू झाले आहे ‘घड्याळ तेच वेळ नवी’ … त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत झोकून काम करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवा मिशन मेळाव्यात केली.

या युवा मिशन – २०२४ महामेळाव्याचे प्रास्ताविक युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले. या मेळाव्यात आमदार सुनिल शेळके, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले विचार मांडले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या युवा मिशन महामेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार चेतन तुपे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अमोल मिटकरी, आमदार निलेश लंके, आमदार सुनिल शेळके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, युवा नेते पार्थ पवार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आदींसह पक्षाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Tags: ajit pawarNationalist Congress PartyncpSunil Tatkare
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.