पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आहेत. शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी दिल्लीच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शेतमालाला हमविभाव, सरसकट कर्जमाफ, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान आज आंदोलक शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या संपला ‘ग्रामीण भारत बंद’ असे नाव देण्यात आले आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. मात्र व्यापारी वर्गाने या बंद ला विरोध केला आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंद मध्ये व्यापारी वर्ग सहभागी होणार नसून, नेहमीप्रमाणेच सर्व दुकाने व इतर व्यवहार सुरळीतपणे सुरु राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या बंद ला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते.
शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात माओवादी सक्रिय झाले असल्याची अत्यंत महत्वाची बातमी माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पक्षाने सरकारला दिली आहे. माओवाद्यांमुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी आता सरकारला घ्यावी लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या आंदोलनात दर्शपाल सिंग हे किसान मोर्चाचे नेते होते. तो आधी माओवाद्यांच्या कार्यकारिणीमध्ये सहभागी होता. त्यानंतर सीपीआय माओवाद्यांच्या सेन्ट्रल कमिटीने त्यांना निलंबित केले आहे. याने मागच्या वेळेस शेतकरी मोर्चाचे नेतृत्व केल्याचे समोर आले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याची माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकांचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे.