धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धनगर समजला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याच्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे धनगर समाजाला मोठा धक्का मानला जात आहे. धनगर आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे धनगर समाजाला आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात अनेक मोर्चे काढण्यात आले होते. अनुसूचित जमातींमधून हे आरक्षण मिळावे अशी धनगर समाजाची प्रमुख मागणी होती. न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.
यामुळे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर धनगर समाजाचे नेते कोणती भूमिका घेतात,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच धनगर समाजची कायदेशीर पावले काय असतील हे देखील आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.