सध्या दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला देशभरातील महत्वाचे नेते, मुख्यमंत्री, संघटक पदांवरील नेते यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जून महिन्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाला पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेने मान्यता दिली आहे. तसेच जेपी नड्डा यांना पक्षाच्या संसदीय मंडळाच्या स्वतंत्रपणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
जेपी नड्डा यांचा कार्यकाळ हा राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान वाढवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पक्षाचे हजारो सदस्य आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि अभियान याविषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले आहेत. २०१९ पर्यंत अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र २०१९ च्या सरकारमध्ये अमित शाह गृहमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर २०१९ पासून जेपी नड्डा हे भाजपाचे पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष बनले.
जानेवारीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्याची घोषणा करताना अमित शाह यांनी टिपण्णी केली. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक होता. एनडीएने महाराष्ट्रात बहुमत मिळविले, उत्तर प्रदेशात विजय मिळवला आणि आमचा पश्चिम बंगालमध्ये आमची संख्या वाढली. गुजरातमध्येही आम्ही दणदणीत विजय नोंदवला.”