आज राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण आहे. मात्र गोव्यामध्ये एक तणावाची बातमी समोर येत आहे. गोवा राज्यतील मडगाव येथे गावात काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. यावर लोकांच्या दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे. मात्र या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले, रविवारी साओ जोस दे अरेल गावा छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला, ज्यामुळे दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस अधीक्षक (दक्षिण) सुनीता सावंत यांनी ”परिस्थिती नियंत्रणामध्ये असून गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे”, सांगितले. हा पुतळा खाजगी जमिनीवर बसविण्यात आल्याचे गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फल देसाई यांनी सांगितले. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
”छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणाचाही आक्षेप नसावा. काही राजकीय शक्ती स्थानिकांना पुतळा बसवण्याविरोधात भडकावत आहेत,” असे ते म्हणाले. भाजप नेते सॅवियो रॉड्रिग्स ‘एक्स’ वर म्हणाले, ” एक भारतीय ख्रिश्चन म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वोच्च आदर आहे. गोव्यातील काही लोक आपल्या मातृभूमीसाठी त्यांच्या बलिदानाची बरोबरी करतात याबद्दल मी निराश आहे.”