देशामध्ये यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. भाजपाने यंदा अब कि बार ४०० पार चा नारा दिला आहे. भाजपा ३७० पेक्षा अधिक तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे, वरिष्ठ नेते भाजपात येताना दिसत आहेत. निवणुकीच्या तोंडावर भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होता दिसून येत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय. भविष्यात काँग्रेसचे देशभरातील अनेक नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
देशात लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीये. निवडणुकीच्या तोंडावर अनेक काँग्रेसचे बडे नेते भाजपात येण्याची शक्यता आहे. देशभरातील काँग्रेसचे १२ ते १५ खासदार, ४० किंवा त्यापेक्षा जास्तीचे आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये त्यांचा भाजपा प्रवेश होऊ शकतो. याशिवाय इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. यासाठी भाजपाकडून चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच मोठ्या राज्यांमध्ये भाजपा जिथे जागा जिंकू शकत नाही तिथे या समितीने मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाने स्थापन केलेली समिती चार राज्यांवर विशेष लक्ष देत आहे. त्यात महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर व मध्य प्रदेश राज्यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये जितक्या जागा जिंकल्या त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मेगाप्लॅन तया रकेला आहे. जर का काँग्रेसचे इतक्या मोठ्या संख्येने नेते भाजपात आले तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व इंडिया आघाडीचे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.