आज विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आज विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक सादर करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विधानसभेत एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
यावर मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता सरकारने मंजूर केलेल्या विधयेकाबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती शुक्रे हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी कायमच मराठा आरक्षणाबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड देखील केली होती. मात्र सदावर्ते हे यांनी भूमिका कायम ठेवली आहे. तसेच या अहवालाला, निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत आवाजी मतदानाने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, टिकणारा आणि धाडसी आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.