रेडिओचा आवाज हरपला
रेडिओचा आवाज, रेडिओ किंग, ज्येष्ठ सूत्रसंचालक अशा उपाध्या मिळालेले अमीन सयानी यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अमीन सयानी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. वृधाप्काळामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गजानी, सामान्य नागरिकांनी अमीन सयानी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
२४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्ता रोको
काल राज्यसरकाने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा विधेयक मंजूर केले होते. मात्र त्यात सगेसोयरे मागणीची अमलबजावणी न केल्यामुळे मानवोज जरंगे पाटील यांनी आज महत्वाची बैठक घेत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. दोन दिवसांत या अधिसूचनेची अमलबजावणी न झाल्यास २४ तारखेपासून गांवागांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर देखील रास्त रोको आंदोलन केले जाईल, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नकोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता सगेसोयरे च्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील अधिक तीव्र आंदोलन करणार असून, सरकार आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
झिशान सिद्दीकी यांची ‘या’ पदावरून उचलबांगडी
काँग्रेसच्या गोटातून एक बातमी समोर येतेय ती म्हणजे काँग्रेस पक्षाने आमदार झिशान सिद्दकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या पदावरून जातवले आहे. त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसला मोठा धक्के बसंत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. बाबा सिद्दकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हापासून झिशान सिद्दीकी पण काँग्रेस सोडणार अशा चर्चाना उधाण आले होते. त्यामुळेच अचानक त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली का असा सवाल आता उपस्थित होत आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर झिशान सिद्दकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असेल.
नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेत्यांमधील वाद किंवा एकमेकांना आव्हान देण्याचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी यावर आता नवनीत राणा यांनी जलील याना प्रत्युत्तर दिलाय. ”या देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. संभाजीनगरला डाग लावणाऱ्या व्यक्तीचे एक वक्तव्य समोर आले. हिम्मत असेल तर अमरावतीत येऊन लढ आणि मला हरवून दाखव. नाही लढला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा जिंकतो तेच बघते. चेला आहे चेलाच राहणार. संभाजीनगरचे लोकं यावेळेस आमच्या संभाजी महाराजांना डाग लागू देणार नाहीत. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले नवनीत राणा तुम्हाला घाबरणारी नाहीये असे जोरदार प्रत्युत्तर राणा यांनी जलील यांना दिले आहे.