आज महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. सध्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प मांडत असताना जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. आजच्या आपल्या अर्थसंकल्पाच्या वाचनाला अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या कवितेने सुरुवात केली. हा अंतरिम अर्थसंकल्प चार महिन्यांसाठी असणार आहे.
जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे. अर्थसंकल्पाचे वाचन करताना अनेक मुरूडयांवर अजित पवारांनी भाष्य केले. त्यात त्यांनी ७ हजार ५०० किमी रस्त्यांची कामे हाती घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला १९ हजार कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील भगवती बंदराची ३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. १ ट्रिलियन पर्यंत अर्थव्यवथा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागास १ हजार कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. वस्त्रोद्योग धोरणांतर्गत एका महिलेस १ साडी देण्याचे काम सुरु आहे. राज्यात निर्यात वाढावी यासाठी ५ इंडस्ट्रिअल पार्क उभारण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. वन विभागाला २ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वीज दर सवलतीमध्ये १ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ३०० युनिट्सपर्यंत वीज मोफत मिळणार आहे.
आज विधानसभेत काय घडले?
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले आहेत.आजपासून (27 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी जरांगेंच्या चौकशीबाबत मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. जरांगेंच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. तर हीच मागणी प्रवीण दरेकर यानी विधानपरिषदेत केली आहे.