संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. स्थानिक तृणमूल नेते शेख शेहजहान आणि त्याच्या साथीदारांकडून वर्षानुवर्षे महिलांचे होणारे शोषण आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने भारतीय जनता पक्ष आता राजधानी कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये आयएसएफचे नेते नौशाद सिद्दीकी यांना अटक केली आहे.
सध्या संदेशाखाली येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे कारण देत संदेशाखालीकडे जाणाऱ्या काँग्रेस पक्षालाही नजतजवळ अडवण्यात आले. आमदार सिद्दीकी यांना कोलकाता येथील सायन्स सिटीजवळ CrPC च्या कलम 151 (अदखलपात्र गुन्हा टाळण्यासाठी अटक) नुसार अटक करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर २४ परगणा जिल्हा प्रशासनाने संदेशाखालीच्या संवेदनशील भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
आमदार नौशाद सिद्दीकी म्हणाले, “त्यांनी मला का अटक केली हे मला माहीत नाही. संदेशाखालीपासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. संदेशाखालीच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी मी तिथे जात होतो. “मी कोणतेही नियम किंवा कायदे मोडले नाहीत.” आमदार म्हणाले, “त्यांनी मला संदेशाखालीपासून ६२ किलोमीटर अंतरावर थांबवले पण जेव्हा दोन राज्यमंत्री पार्थ भौमिक आणि सुजित बोस तेथे गेले तेव्हा त्यांनी मला थांबवले नाही. पोलिस केवळ संदेश देऊन विरोधकांना रोखत आहेत. ते काय लपवू पाहत आहेत?” सकाळी नऊच्या सुमारास सिद्दीकी आपल्या दोन सुरक्षा रक्षकांसह सायन्स सिटीमध्ये पोहोचले तेव्हा कोलकाता पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने त्यांना रोखले.
संदेशाखाली प्रकरणात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याना अटक होणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर संदेशखाली येथील महिलांवर अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच जबरदस्तीने जमीन हडपत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. संदेशाखाली परप्रकणात चौकशीसाठी गेलेल्या ठिकाण ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यापासून शाहजहान शेख हे फरार आहेत. संदेशाखाली प्रकरणात शाहजहान शेख यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका कोलकत्ता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयात संदेशाखाली प्रकरणी सुनावणी सुरु आहे. शाहजहान शेख यांच्या अटकेवर कोर्टाने कधीही आपले मत व्यक्त केले नाही असे सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीनी सांगितले. त्यांना अटक झाली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.