यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेकांना मी पाहिले आहे, मात्र जबाबदार पदावरील व्यक्तीने असे पोरकट आरोप केलेले मी याआधी कधीही पाहिलेले नाही, अशा शब्दांमध्ये ‘जरांगे शरद पवार यांची स्क्रिप्ट बोलतात’ या आरोपाला जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे . जरांगे यांनी अगदी सुरुवातीला उपोषण केले, त्यावेळी त्यांची भेट घेणारा मी पहिलाच होते. मात्र त्याही वेळी मी त्यांना राज्याच्या सामाजिक ऐक्याला धक्का लागेल असे काही करू नका, हेच सांगितले होते. त्यानंतर त्यांची व माझी आजतागायत भेटही नाही व बोलणेही नाही, असेही ते म्हणाले.
हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली. खासदार सुप्रिया सुळे याही त्यांच्यासमवेत होत्या. बैठका संपल्यानंतर सायंकाळी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे .