पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना अटक केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत खडे बोल सुनावल्यानंतर पोलिसांनी शाहजहान शेख यांना अटक केली आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या बशीरहाट न्यायालयाने आज तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) शाहजहान शेखला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंगाल पोलिसांनी ही अटक केली आहे. बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखला अटक केली आहे. दरम्यान या बाबतीत आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
संदेशखाली प्रकरणात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टाच्या आदेशानुसार शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता याबाबत एक मोठी घडामोड घडली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील संदेशाखाली खंडणी, जमीन बळकावणे आणि बंगालच्या संदेशखळी येथील लैंगिक अत्याचाराच्या अनेक तक्रारींतील प्रमुख आरोपी तृणमूल काँग्रेसचे माजी नेता शाहजहान शेख यांना सीबीआयकडे हॅन्ड ओव्हर करण्याचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत शाहजहान शेख आणि संदेशाखाली प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयकडे सोपवावीत असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने संदेशखालीसह सात ग्रामपंचायतीमध्ये अर्धा किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे संदेशाखाली प्रकरण: आरोपी शाहजहान शेखला १० दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निर्णय त्या भागात भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. त्यादृष्टीने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.