नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना व्हाट्सअँपवर एक क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधून आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पहिल्यांदा धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पुन्हा एडका जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. खासदार नवनीत राणा या नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात.
महाविकास आघाडीचे सरकार असताना हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्द्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच खासदार नवनीत राणा यांनी अनेकदा संसदेत देखील राम मंदिर असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच मध्यंतरी त्यांच्यात आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोप झाले होते. या देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. तसेच त्यांचे पती रवी राणा देखील आमदार आहेत. दोन्ही अपक्ष निवडून आले आहेत. तसेच सध्या त्यांचा पाठिंबा महायुतीला आहे. मविआ सरकार असताना हनुमान चालीसा प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून की, अपक्ष म्हणून उभा राहतात ते पाहणे महत्वाचे असणार आहे.