पुण्यातून मुरलीधर मोहोळांना मिळणार लोकसभेची उमेदवारी?
देशात एप्रिल मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरात भाजपाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तसेच उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे सर्वात जास्त लोकसभेच्या जागा देणारे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये ४८ लोकसभा मतदारसंघ आहे. महायुतीने राज्यात ४५ प्लस हे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभेत ४५ पेक्षा जास्त जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. भाजपाने २३ जागांवर आपले निरीक्षक नियुक्त केले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोघांची नवे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना उद्यापासू
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. भारताने आधीच ही मालिका आपल्या खिशात घातली आहे. भारताने चौथा कसोटी सामना जिंकत ३-१ अशी या मालिकेत आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना हा उद्यापासून म्हणजे गुरूवारपासून सुरु होणार आहे. इंग्लंडला आधीच्या तीन सामन्यांत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. आता इंग्लंड संघ किमान शेवट तरी गोड व्हावा यासाठी हा सामना जिंकण्याचे प्रयत्न करणार आहेत. इंग्लंडने हैद्राबाद येथील सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर भारताने इंग्लडला विजयाची संधी दिली नाही. यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजाने तर या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिला सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने सलग तीन सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने भारतीय संघ आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबो
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. जळगाव येथील युवा शक्ती संगम कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ”पवार साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १० वर्षे झाली. महाराष्ट्रातील जनता ५० वर्षांपासून तुम्हाला सहन करत आहे. ५० वर्षे सोडा, तुम्ही ५ वर्षांचा तरी हिशेब द्या. मी तर १० वर्षांचा हिशेब घेऊन आलोय. या जगामध्ये भीतीला कोणतीही जागा नाही. केवळ ताकदच जगात सन्मान मिळवून देऊ शकते. सर्व युवांनी एकत्रित येऊनतिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना ४०० पार बहुमत देऊन जिकवून द्यावे. ४०० पार मिळण्याप्रमाणे आम्ही काम केले आहे. मतांच्या राजकारणासाठी आपल्या संस्कृतीला यांना दाबून ठेवले. काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी ७० वर्षे रामलल्लाला तंबूत ठेवले. मोदीजींनी भूमिपूजन देखील केले आणि प्रभू श्रीरामांची अयोध्येत भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठपना देखील केली.
नरेंद्र मोदींनी केले अंडरवॉटर मेट्रोचे लोकार्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मंगळवारी (5 मार्च) ते कोलकाता येथे पोहोचले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांतील हा दुसरा पश्चिम बंगाल दौरा आहे. पंतप्रधान मोदींनी आज कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी शाळकरी मुलांसोबत मेट्रोमध्ये बसून प्रवास केला. मेट्रोमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करताना पंतप्रधान मोदींनी मेट्रो कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे देखील लोकार्पण केले आहे.