पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक राज्यांचे दौरे करत आहेत. प्रत्येक राज्यात हजारो कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि उदघाटन ते करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते ५,००० कोटींच्या विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. मात्र या दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान तगडा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बक्षी स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण स्टेडियम तिरंग्याच्या रंगात रंगले आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने आणि विरोधी पक्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची मागणी केल्याने पंतप्रधान मोदी या मुद्द्यांवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रद्द केल्या आणि राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मोदी कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५,००० कोटी रुपयांचा ‘हमग्रा कृषी विकास कार्यक्रम’ (HADP) लॉन्च करणार आहेत.