शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा हा वाद केंद्रीय निवडण्याक आयोगासमोर आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा वाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आला. यात निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. तर, राहुल नरेवकरांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यानंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. आजचा दिवस ठाकरे गटाची महत्वाचा मानला जातोय कारण, ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार निकाल देत शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याच असल्याचा निर्णय दिला. तसेच व्हिपचे पालन योग्य प्रकारे न झाल्यामुळे ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाच्या आमदारांना नार्वेकरांनी पात्र ठरवले आहे. मात्र हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यासंदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र न ठरवल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ऐकायचे की उच्च न्यायालयाकडे पाठवायचे यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या ठाकरे गटाचे आमदार अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील याचिका देखील करण्यात आली आहे.