आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) एनडीएमध्ये सामील होणार असल्याचे निश्चित झाले आहे. टीडीपी खासदार कनकमेडला रवींद्र कुमार यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
ते म्हणाले आहेत की , “आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी पवन कल्याण यांच्यासह अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि तेव्हाच की टीडीपी एनडीएमध्ये सामील होत आहे हे नक्की झाले. आणि जनसेना आधीच एनडीएचा भाग आहे आणि आंध्रमध्ये आगामी 2024 च्या निवडणुका हे तिन्ही पक्ष एकत्र लढवणार आहेत . एनडीएचा सदस्य असलेल्या अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाने यापूर्वीच टीडीपीशी हातमिळवणी केली आहे.
शुक्रवारी टीडीपी अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली होती.
मात्र, भाजप, टीडीपी आणि जनसेना यांच्यातील जागावाटपाचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.पण ही युती आणि चंद्राबाबू नायडूंचे एनडीएमध्ये पुनरागमन हे दोन्ही पक्षांनी आंध्र प्रदेशात आपले स्थान बळकट करण्यासाठी एक धोरणात्मक चाल म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार के रवींद्र कुमार म्हणाले की, भाजप, जनसेना आणि टीडीपी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने चंद्राबाबू नायडू यांनी 2018 मध्ये NDA मधून बाहेर पडल्यामुळे टीडीपीने भाजपशी संबंध तोडले होते. .
दरम्यान, भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ची युती वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे बुधवारी (6 मार्च) रोजी भुवनेश्वरमधील बिजू जनता दल अर्थात बीजेडीचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी नवीन निवास येथे निवडणुकीसंदर्भात दीर्घ बैठक झाली.
या बैठकीनंतर बीजेडीचे उपाध्यक्ष देबी प्रसाद मिश्रा म्हणाले की, भाजपसोबत युती करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. आमचा पक्ष ओडिशाच्या लोकांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेईल.
असे झाल्यास 15 वर्षांपूर्वी तुटलेली युती पुन्हा होताना दिसणार आहे. 1998 मध्ये भाजप आणि बीजेडी यांच्यात युती होती,