आज मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
कोस्टल रोडचे एका मार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक खासदार, मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थिती होते. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना जोरदार टोले लगावले आहेत. कोस्टल रोडचे आज एका मार्गिकेचे लोकार्पण होत असून, दुसरी मार्गिकही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम महायुती सरकारने केले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आधीच्या सरकारने विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचे काम केले. आमच्या सरकारच्या काळात विकासकामांना वेग आला असून, गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यातच आता पाठोपाठ कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात आल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी असा या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे.