आज केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने एक अधिसूचना काढत देशभरात CAA कायदा लागू केला आहे. लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीआधी CAA कायदा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. त्यानुसार आज केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जनतेला संबोधित करणार आहेत. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1767169391026638878?t=Gi8aQ__XacPtyrIOo0ZmmQ&s=08
CAA कायदा जारी केल्यानंतर, आता केंद्र सरकार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करेल. सीएए डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला आणि नंतर त्याला राष्ट्रपतींची संमती देखील मिळाली आहे. मात्र यानंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात प्रदर्शने करण्यात आली.