लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केली आहे .तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मात्र याचबरोबर राजीव कुमार यांनी पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही कानपिचक्या दिल्या आहेत, आणि नियमांचे कसोशीने पालन करण्यास सांगितले आहे.
वैयक्तिक पातळीवर टीका नको. पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात. तसेच धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत
यावेळी आचारसंहिता भंग करणाऱ्या राजकीय पक्षांचा इतिहास तपासली जाईल. जाहिरात जाहिरातीच्या स्वरूपात छापली जावी. खोट्या माहितीवर आधारित वक्तव्य, विधान केले जाऊ शकत नाही. निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको. धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत.
मतदारांचा विश्वास सुनिश्चित करणे सर्वोपरि आवश्यक आहे. निवडणुकीतील हिंसाचार अस्वीकार्य आहे. तोतयागिरी करणाऱ्यांना त्वरीत शिक्षा केली जाईल
कोणताही प्रचार होताना कोणत्याही प्रकारची मर्यादा न ओलांडण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आले आहेत. जर असे झाल्यास राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांना देखील प्रचारात सामावून घेता येणार नाही.
मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत असे राजीव कुमार म्हणाले आहेत. कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाकल्यास संबंधित ठिकाणी निवडणूक अधिकारी पोचून कारवाई करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात असून त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन आपल्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे.
या निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीच्या बळाचा आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे कुठेही हिंसा झाल्यास अजिबात दया दाखवली जाणार नाही, असे म्हणत राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना कठोर इशारा दिला आहे.
‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
सध्याच्या काळात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल सीईसी कुमार म्हणाले, “चुकीची माहिती रोखण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. आम्ही खोट्या बातम्यांचा छडा लावण्यासाठी सक्रिय आहोत. बनावट बातम्या तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुठेही कोणत्याही प्रकारच्या वस्तू या फुकट वाटल्या जाणार असतील तर त्या रोखण्यासाठीचे आदेश आम्ही यंत्रणांना दिले आहेत.
“Verify Before You Amplify” हा खोट्या बातम्यांचा सामना करण्याचा मंत्र आहे. अचूक माहिती प्रचलित आहे याची खात्री करण्यासाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहू या. जागरुक राहा आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आम्हाला मदत करा,” ते पुढे म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना खोट्या बातम्या आणि असत्यापित माहिती फॉरवर्ड न करण्याचा सल्ला देणारी शायरी नमूद केली आहे.
“झूठ के बाजार में रौनक तो बहुत है, गोया बुलबुले जैसी तुरंत ही मोटी जाती है..
पकड भी लोगे तो क्या हसील होगा सिवाये धोके के,” असे ते आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले आहेत.