दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरु होत्या. तसेच राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अमित शहा यांची राज ठाकरेंनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. सध्या मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. कारण मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे राज ठाकरे यांच्या अत्यंत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मनसे महायुतीमध्ये सामील होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मनसे भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु आहे. मात्र त्या आधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर ते एकत्रितपणे अमित शहांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते. दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता असून, मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहेत. असे झाल्यास राज्यात महायुतीला लोकसभा आणि विधानसभेला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे राज्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान याबाबत देवेंद्र फडणवीसांनी एक दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल असे सांगितले आहे.
महायुतीचे जागावाटपावर दिल्लीत बैठक
महायुतीमध्ये ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. काही जागांवरून महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अजूनही साशंकता आहे. नाराजी असल्याचे जागावाटप निश्चित झालेले नाही. मात्र आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे.