लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने जागावाटपासंदर्भातील चर्चा सुरु केली आहे. तर राज्यात देखील महायुती आणि मविआ यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मविआमध्ये अजूनही जागावाटपावरून अजूनही मतभेद आहेत. बारामती, मावळ अशा अनेक जागांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे मतभेद झालेले दिसून येत आहेत. त्यात आता सांगलीची जागाही अधिक चर्चेत आली आहे. दरम्यान काळ जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे वृत्त समोर येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरून मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तणाव आहे. दरम्यान काल उद्धव ठाकरेंची मिरज येथे जनसंवाद मेळावा झाला. यामध्ये त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान यावरून काँग्रेस नाराज झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली. ठाकरेंनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करून केल्याने अडचण निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे होईल नको. एकीकडे चर्चा सुरु असताना उमेदवार जाहीर करायला नको होता. ठाकरेंनी अशाप्रकारे उमेदवार जाहीर करणे योग्य नसल्याचे नाना पटोले म्हणाले.
सांगलीच्या जागेचा तिढा काय
सांगली मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. या जागेवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आमच्याकडे असेल असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर सांगली जागा काँग्रेसकडे राहावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे या जागेचा तिढा कधी सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.